जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव औरंगाबाद हायवेवर ३ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता चिंचोली ते उमाळा गावांदरम्यान तीन जणांनी लिफ्ट मागून एकास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करून फिर्यादीची सोन्याची चैन , अंगठ्या रोख रक्कम असा एकूण १०२५०० रुपयांचा इवजज लुटून नेल्याची घटना घडली होती. तसेच याप्रकरणात निवृत्ती बाविस्कर, वय ३२ रा. मेस्कोमाता नगर , राहुल रामदास कोळी वय २२ रा. मेस्कोमाता नगर या दोघांना ५ एप्रिल रोजी अटक केली होती मात्र त्यांचा तिसरा साथीदारआकाश गायकवाड वय २५ रा. रामेश्वर कॉलनी हा फरार होता . त्याला २० रोजी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक मोल मोरे करीत आहे.