जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मोठी कारवाई करत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अखेर अटक केली आहे. फैजपुर येथील एका हॉटेलमधून त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथे दि. ०७ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शरद बागल व श्रे. पोउपनि रवि नरवाडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दि. २७ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथे असल्याची खात्री झाल्यावर पथकाने फैजपूर पोलीसांच्या मदतीने फरार आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाईत पोउपनि शरद बागल, श्रे. पोउपनि रवि नरवाडे, पोहेकों गोपाळ गव्हाळे, पोहेका उमाकांत पाटील, पोकों विकास सातदिवे, पोकों प्रशांत परदेशी, पोकी राहुल वानखेडे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच फैजपूर पो.स्टे. येथील सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैय्यद, पोकों जुबेर शेख आदींचा सहभाग होता.