जळगावमधील शनिपेठ परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जोशी पेठ येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
शामसुंदर ओमकार पाटील (वय-५२, रा. जोशी पेठ जळगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्यामसुंदर पाटील हे आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शहरातील रेमंड कंपनीत नोकरीला होते. दरम्यान रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किरण नारखेडे आणि राहुल पाटील यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.