अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून १ लाख ९ हजार रुपये किमतीची तांब्याची तार व ऑइल चोरीस गेली. ही घटना दि. २७ रोजीच्या मध्यरात्री देवळी शिवारात घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
कंपनीचे कर्मचारी सुनील शालीग्राम पाटील हे दि. २८ रोजी सकाळी कंपनीवर गेले असता कंपनीचा ट्रान्सफॉर्मर खाली उतरवलेला दिसला. तेथील १ लाख रुपयांची तांब्याची तार आणि ९ हजार रुपये किमतीचे ऑइल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सुनील पाटील यांनी मालकाला कळविले. त्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला धाव घेतली. तेथे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.