कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा
जळगाव ( प्रतिनिधी ) – आज दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जळगाव व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना व एम्पलोयी एनरोलमेंट कॅम्पेन २०२५ या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून नाशिक रीजनचे रिजनल कमिशनर श्री अनिल कुमार प्रीतम हे बोलत होते.
व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे असिस्टंट कमिशनर श्री के के कुंभार इन्स्पेक्टर श्री दीपक चौधरी तसेच परिसंस्थेचे संचालक डॉ प्रशांत वारके हे उपस्थित होते . पुढे बोलतांना त्यांनीअनिल कुमार प्रीतम यांनी आपल्या भाषणात योजनेच्या काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या पहिल्यांदाच काम करणार्या कर्मचार्यांसाठी इपीएफओ मध्ये नोंदणीकृत असे पहिल्यांदाच काम करणारे कर्मचारी ज्यांचे मासिक पगार एक लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना १५,००० पर्यंतचे एक महिन्याचे वेतन दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल. पहिले हप्ता ६ महिन्यांच्या सलग सेवेनंतर आणि दुसरे हप्ता १२ महिन्यांच्या सेवेनंतर, ज्यावेळी कर्मचारी आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करतो.या प्रोत्साहनाचा एक भाग बचत खात्यात (सेव्हिंग / डिपॉझिट अकाउंट) ठेवला जाईल, जेणेकरून बचतीची सवय वाढेल. नियोक्त्यांना प्रत्येक अतिरिक्त भरलेल्या कर्मचार्यासाठी दरमहा ३,००० पर्यंत प्रोत्साहन दिले जाईल, दोन वर्षांसाठी. उत्पादन क्षेत्रात हे प्रोत्साहन तिसर्या व चौथ्या वर्षासाठीही विस्तारले जाईल. नोंदणीकृत आस्थापनांना कमीत कमी २ नवीन कर्मचारी (जर कर्मचारी संख्या ५० पेक्षा कमी असेल) किंवा ५ नवीन कर्मचारी (जर ५० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील) बांधणे आवश्यक आहे, आणि हे कर्मचारी किमान ६ महिन्यांसाठी सलग काम करत राहतील. मोड वापरण्यात येईल.
कर्मचार्यांसाठी हे आधार-बेस्ड पेमेंट पद्धतने केले जाईल, तर नियोक्त्यांसाठी पेमेंट लिंक खात्यांमध्ये होईल या योजनेचा फायदा उद्योग-नियोक्त्यांसाठी तसेच युवा कर्मचार्यांसाठी कसा होईल हे स्पष्ट केले, सदर कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सुमारे १२० उद्योग क्षेत्रातील उद्योजक व अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु भूमिका नाले यांनी केले









