तज्ज्ञ डॉक्टरांचे होणार मार्गदर्शन
जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने दि. २८, २९ जानेवारी रोजी ‘आयसीयू आपत्कालीन स्थिती ३६०°: एक बहुविद्याशाखीय आणि पॉइंट-ऑफ-केअर दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय ‘कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत आयसीयूमध्ये उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितींवर मात करण्यासाठी विविध तज्ज्ञ वक्ते खालील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार, २८ जानेवारी रोजी
आयसीयू रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याविषयी डॉ. पाराजी बाचेवार व डॉ. अमित हिवरकर बोलतील.तीव्र श्वसन विकार व व्हेंटिलेटर व्यवस्थापन यावर डॉ. विश्वनाथ पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. शॉक आणि सेप्सिसविषयी डॉ. नेहा चौधरी व डॉ. सायली पाटील, आयसीयूमध्ये हृदयविकार तज्ज्ञांची भूमिकाबाबत डॉ. मिलिंद वायकोळे सांगणार आहेत.
गर्भावस्थेतील आपत्कालीन आयसीयू परिस्थितीवर डॉ. विलास भोळे, किडनीला होणारी गंभीर इजा आणि डायलिसिसची गरज यावर डॉ. अमित भंगाळे, मेंदूविकार व फिट्स याविषयी डॉ. सुनील गाजरे, डॉ. गोपाळ घोलप आणि डॉ. अभिजित पिल्लई सांगणार आहेत. मधुमेह व अंतःस्त्राव ग्रंथींशी संबंधित आणीबाणी माहिती डॉ. चिमू चिंते देणार आहे. यकृताचे गंभीर विकारबाबत डॉ. यतीन बोरोले सांगतील.
दुसऱ्या दिवशी गुरुवार, २९ जानेवारी रोजी आयसीयूमध्ये ‘पोकस’चा वापरबाबत डॉ. किरण पाटील, आयसीयू मधील कायदेशीर बाबीविषयी डॉ. रमेश वासनीक, आयसीयू मध्ये संधिवात तज्ज्ञांची भूमिकाविषयी डॉ. आस्था गनेरीवाल बोलणार आहेत. एबीजी इंटरप्रिटेशन बाबत डॉ. दीपक पाटील माहिती देतील. हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथीवर डॉ. भूषण चोपडे बोलणार आहेत.
प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर असून, आयोजन अध्यक्ष म्हणून डॉ. पाराजी बाचेवार काम पाहत आहेत. तसेच उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. रमेश वासनीक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावीत आणि आयोजन सचिव डॉ. नेहा चौधरी व डॉ. अमित भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून ४ क्रेडिट पॉईंट्स लागू करण्यात आले आहेत. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या ‘ॲनाटॉमी हॉल’मध्ये संपन्न होईल.









