जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील इच्छादेवी चौकात दुचाकींच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईजहारोद्दीन नमजमोद्दीन शेख (वय-४२, रा. तांबापुरा) हे २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचे सहकारी गुरुसैयद कलीम अल्ताफ नुरी यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ५९५५) ने जात होते. ईच्छादेवी चौकातील पन्नालाल वखार येथून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीक्यू ४९०७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत ईजहारोद्दिन शेख आणि गुरूसैय्यद कलीम अल्ताफ नुरी हे दोघे जखमी झाले व दुचाकीचेही नुकसान झाले. जखमींना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता (एमएच १९ सीक्यू ४९०७) वरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करत आहेत.