जळगाव ( प्रतिनिधी )- यावल येथे माहेर असलेल्या विवाहितेला लग्नात हुंडा व पैसे दिले नाही म्हणून मारहाण करून छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीसत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील माहेर असलेल्या मोनिका मिलींद ताडे (वय-२६ , रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा) यांचा विवाह मिलींद अनिल ताडे यांच्याशी झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मिलींद याने विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे व मारहाण करणे सुरू केले. सासू, आजल सासू, मावस सासू यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पती मिलींद अनिल ताडे, सासू राजकन्या ताडे, मामे भाऊ सुमित विधाते, गैनिनाथा विधाते, आजल सासू कमलबाई विधाते, सुमित्रा सौदागरे, रविंद्र भोजकर आणि मिरा भोजकर ( सर्व रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







