पुण्यासह जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – हुंडा म्हणून पाच तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू न दिल्याने लग्न मोडण्यासह तरुणीला मारहाण करण्यात आली. हा प्रकार १८ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान पुणे व जळगावात घडला. याप्रकरणी जळगावातील चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील निमखेडी शिवारातील २८ वर्षीय तरुणी पुणे येथे नोकरीला आहे. तिचे लग्न ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी तरुणीच्या कुटुंबीयांकडे संसारोपयोगी वस्तूंची मागणी केली. तसेच, पुणे येथे तरुणी व उपवर तरुण वेगवेगळे राहत असताना तरुणीने काही वस्तू तरुणाला दिल्या होत्या. त्या वस्तू घेण्यासाठी तरुणी गेली असता तिला तरुणाकडील चार जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तिला धमकीदेखील देण्यात आली. याप्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश राजेश कांबळे, राजेश कांबळे, कविता राजेश कांबळे, किरण राजेश कांबळे (सर्व रा. बीएसएनएल क्वॉर्टर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.