शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणबाबत शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका समादेशक संजय पाटील, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, अशोक बावस्कर, क्रीडा शिक्षक संजय काटोले, नायक रवींद्र ठाकूर हे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व कंपनी नायक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पटनायक नितीन भावसार यांनी विद्यार्थ्यांना स्व संरक्षणार्थ बाबत सखोल माहिती दिली.
दिगंबर महाजन यांनी व त्यांच्या होमगार्ड टीमसोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. सदर प्रसंगी राजेंद्र तायडे, निलेश निकम, सोहेल तडवी,असलम पिंजारी, आरती ढगे, दिव्या बारी, डिंपल गुंजनकर, वैशाली कोळी आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .सदर शिबिरात सुमारे ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शिबिराचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले तर आभार घनश्याम काळे यांनी मानले. सदर शिबिरासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.