• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

होळी सणाचा आनंदावर विरजण : तिघं मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत तरुणाला अटक, डंपर रिव्हर्स घेताना घडली होती घटना !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हिट अँड रन : झोपलेल्या तिघा मजुरांना भरधाव वाहनाने चिरडले, जागीच ठार !

नशिराबाद पोलिसांच्या तपासातून निष्पन्न, पोलीस अधीक्षकांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळ पुलाच्या जवळील बांधकामाच्या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील तिघं मजुरांचा अज्ञात वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करीत २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश सुदामाकुमार पटेल (वय २३, रा. उफरवली पोस्ट कोदोरा ता. सियाबल जि. सिंधी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सदर भीषण घटना घडली होती.(केसीएन)या घटनेमध्ये १४ वर्षीय योगेश कुमार राजबहादुर (रा. सीढपुरा ता. कासगंज जि. पटियाली) या बालकासह शैलेंद्रसिंग नथूसिंग राजपूत, भूपेंद्र मीथीलाल राजपूत (दोन्ही रा. दलेलपूर ता.जि. विटा उत्तर प्रदेश) असे मयत झाले होते. यातील एकाच्या डोक्यावरून तर दोघांच्या अंगावरून वाहन गेले होते. जळगाव खुर्द गावाजवळ नाल्याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. हे काम आटपून काही मजूर निघून गेले होते. तर उर्वरित ३ कामगार हे थांबून तिथेच रात्री झोपले होते. तर सकाळी कामाची आवरसावर करून मग उत्तर प्रदेश येथील गावाला तिघही होळी सणानिमित्त जाणार होते.

तपासांती हे वाहन मुरुमाने भरलेले डंपर असल्याचे व त्याचा क्रमांक (एमएच १९ सीवाय ३१९१) असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी सीसीटीव्ही आणि काही नागरिकांच्या चौकशीमधून माहिती समोर आल्यानंतर संशयित आरोपीचा नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाला शोध लागला.(केसीएन)ओरिएंट सिमेंटच्या एका सीसीटीव्ही कॅमेराची देखील महत्त्वाची मदत यासाठी झाली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे, आदींनी केली आहे. पोहेका अतुल लक्ष्मण महाजन यांनी दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वीजबिल वसुलीसाठी नवमाध्यमांसह हलगी, दवंडी, भोंग्याचा वापर

Next Post

शासकीय रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक

शासकीय रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon