हिंगोणा ( प्रतिनिधी) – तालुक्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी व सध्या वादग्रस्त झालेली हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध ठीकाणी शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले कॉंक्रीटचे रस्ते हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत आहे . या कामाची हिंगोणा ग्रास्थांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनात ग्रामस्थ संतोष शामराव सावळे व बाळु कुरकुरे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतव्दारे खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतुन लाखो रुपयांच्या खर्चातुन राममंदिर परिसर , महाजन गल्ली , राणे वाडा, तडवी वाडा व इतर ठिकाणी कामे करण्यात येत असुन, संबंधीत ठेकेदार शासनाची निवीदा व अटीशर्ती धाब्यावर बसवुन कामात सिमेंटचा कमी वापर तसेच कमीलेअर निकृष्ठ प्रतिची माती मिश्रित वाळुचा वापर करून अत्यंत निकृष्ठ प्रतिचे कॉंक्रीट रस्ते तयार करीत आहे. ठेकेदारास ग्रामस्थ वारंवार कामाची गुणवत्ता सुधारावी अशा सुचना देवुन देखील या सुचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याचीही ओरड आहे . कालच तयार केलेल्या कॉक्रीट रस्त्याला दुसऱ्याच दिवशी तडे पडल्याने ठेकेदाराच्या कामाची गुणवता लक्षात येत असुन, ठेकेदाराच्या अशा वागण्यावरून पंचायत समितीचे बांधकाम अभियंता व ठेकेदारात यांचे या निकृष्ठ प्रतिच्या कामात आर्थिक स्वार्थासाठी संगनमत झाल्याने अशा प्रकारच्या निकृष्ठ कामांना पाठबळ देत असल्याचे ग्रामस्थांची तक्रार आहे . तरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी तात्काळ या ठेकेदार आणि अभियंता यांच्याकडुन करण्यात येत असलेल्या रस्ते कामात भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी संतोष शामराव सावळे .व .बाळु कुरकुरे यांनी तक्रारी द्वारे केली आहे .