जळगाव (प्रतिनिधी) – येथील भारतीय मुस्लिम महिला मंडळा तर्फे कर्नाटकमधील हिजाब बंदीचा निषेध १० रोजी करण्यात आला. निषेध कार्यक्रमात भारतीय मुस्लिम महिला मंडळातील सर्व सदस्य व असंख्य मुस्लिम मुलींनी सहभाग नोंदविला. मुलींनी “वी लव्ह हिजाब”, “वि सपोर्ट हिजाब” , “हम इमानदार पत्रकारोका सन्मान करते है” यासारख्या पोस्टर हातात घेऊन नारे लावले.
महिला मंडळाची जनरल सेक्रेटरी डॉ. फिरदोस शेख यांनी हिजाब हा संविधानिक अधिकार असून हा अधिकार कोणेही हिसकावून घेऊ शकत नाही. भारतीय विविधता हीच भारताची ओळख असून विविधता तोडण्याच्या काम काही लोक करीत आहे. तरी मा. मुख्यमंत्री कर्नाटक व मा. पंतप्रधान यांनी यात लक्ष घालून हिजाब बंदी मागे घ्यावी आणि मुस्लिम महिलांना शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी त्रास देण्याचे काम थांबवावे. प्रो. रेखा देवकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की आधीच शिक्षणात मुस्लिम मुली मागे असून हिजाब बंदी मुळे अजून मुली शिक्षणापासून वंचित होतील, तरी असे आदेश मागे घेऊन संविधानाच्या मान ठेवावा व राजकीय रंग या गोष्टीन्ना न देता हिजाब बंदीचा आदेश मागे घ्यावा. अशी मागणी करण्यात आली.
इकरा शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी हीजाब बंदीच्या निषेध व्यक्त केला. आज मुस्लिम मुलीं देखील अन्याया विरुद्ध लढा देत आहेत, तसेच कोर्टाकडून देखील आशा आहे की, मुस्लीम महिलांच्या बाजूने आदेश द्यावेत. या लढायात फक्त मुस्लिम महिला एकट्या नाही तर सर्व समाज तसेच इतर समाज देखील मुस्लिम महिला सोबत आहेत. या निषेध कार्यक्रमात सोफिया सालार, डॉ.सुमय्या सालार, गुलरिना सालार, राहत शाह, तबस्सुम शहा, प्रो. देवकर आर. सी., प्रो. शबाना खाटीक, प्रो. अमरीन शेख तसेच असंख्य मुली उपस्थित होत्या.