भुसावळ ( प्रतिनिधी ) – क्षुल्लक भांडणात रागाच्या भरात आपल्या वयोवृध्द सासुवर विळ्याने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. द्वारकाबाई सोनवणे (75) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,शहरातील गजानन महाराज नगर भागात
द्वारकाबाई सोनवणे या आपला मुलगा रविंद्र सोनवणे
आणि सुन उज्वला सोनवणे (38) हिच्यासह वास्तव्यास आहेत. उज्ज्वला ही मनोरुग्ण आणि रागीट स्वभावाची असल्याने द्वारकाबाई हीचा मुलगा हा बाहेर बाजारात गेला असल्याने सासू सुनेचे भांडण झाले. यात उज्वला हिने सासु द्वारकाबाई हिला रागाच्या भरात विळा घेऊन डोके आणि पाठीवर वार करून तिची हत्या केली.यामुळे शहरत खळबळ उडाली आहे
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे डी वाय एस पी.नितीन गणापुरे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी आदींनी पाहणी केली. उज्वला सोनवणे हिला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मयत द्वारका बाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.