चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल ; पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले
जळगाव ( प्रतिनिधी) – वाळूचे ट्रॅक्टर पकडून देण्याच्या संशयावरून व इतर कामांमध्ये व्यत्यय आणत असल्याच्या संशयावरून हातेड बुद्रूक, ता.चोपडा येथील रहिवासी तथा भाजपचे जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना हातेड खुर्द व भार्डू दरम्यान असलेल्या नाल्यात २० – २५ जणांनी जबर मारहाण केली. रात्री ८ वाजता सरकार फिर्यादीवरून दोघे पार्टी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळत असून पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे ही माहिती समोर आली आहे. काहीचा शोध व तपास सुरु आहे.
मारहाण करतांना लाठ्या-काठ्यांंचा वापर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली. या मारहाणीत चुंचाळे-अकुलखेडा गटाचे भाजपचे जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे यांना जबर मुका मार लागला असून, पायासह शरीराचे काही अवयवही फ्रॅक्चर झाल्याचा अंदाज आहे. चोपडा शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना याबाबत विचारले असता मारहाण झाल्याचे सांगितले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण होऊनही सकाळ पासून पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला कोणी न आल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. मात्र रात्री 8 वाजता सरकार फिर्यादीवरून दोघे पार्टी वर आर्म अँक्टनुसार चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान भार्डू-हातेड खुर्द दरम्यान ही मारहाण झाली आहे. एकूण ५ ते ६ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे कळते