जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शिक्षक शिक्षकेतर संघटना एकत्र येवून अनुदानाच्या मागणीसाठी करत असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास सक्रीय पाठींबा देणे बाबत गेल्या 10/11दिवसांपासून उपोषणास बसलेल्या व शिक्षिका बघिनी मुंडन करू पाहत असलेल्या दिनांक १३-९-२०१९ घोषित नुसार अनुदान मंजूर २० टक्के व वाढीव ४० टक्के चा निधी वितारणाचा आदेश तत्काळ काढावा.अनुदान हे अत्यंत महत्वाचे ध्येय आहे
अघोषित सर्व शाळा महाविद्यालये निधीसह घोषित करावे या व इतरही मागण्यासाठी दिनांक २९-१-२०२१ पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.या मागण्या अगदी रास्त असून शासनाने तत्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे.इतकी वर्ष शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सेवा दिल्यानंतर अनुदान मिळणे अत्यावश्यक आहेच. तसेच हे आंदोलन यशस्वी होवून विनाअनुदानीत शिक्षकांना अनुदान मिळावे,हि किमान अपेक्षा.
तुमच्या या न्याय व हक्क लढाईकरिता भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी जळगाव आपल्या सोबत असल्याची माहिती शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे .







