जैतपूर ( वृत्तसंस्था ) ;- मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी भाजप नेत्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या जैतपुर जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणीचे 18 फेब्रुवारी चार जणांनी अपहरण केले. चार जणांनी तिला एका फार्म हाऊस मध्ये नेले. तिला जबरदस्ती दारू पाजली आणि दोन दिवस तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. नंतर 19 फेब्रुवारी रोजी चारही आरोपींनी तिला तिच्या घराजवळ सोडले आणि तिथून पळ काढला.
21 फेब्रुवारी रोजी पीडित मुलीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तसेच चार आरोपींमध्ये भाजपचा जैतपूर मंडल अध्यक्ष विजय त्रिपाठी असल्याचेही तिने सांगितले. विजय त्रिपाटीसोबत राजेश शुक्ला, मुन्ना सिंह आणि मोनू सिंह अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींचे वय हे 35 ते 40 आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
ही बातमी कळताच विजय त्रिपाठीला पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे जैतपूर जिल्हाध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी दिली आहे.