शेंदूर्णी : – शेंदूर्णीजवळच्या बिलवाडी भाजपचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत उमेदवार गोकुळ म्हस्के यांनी समर्थकांसह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
जामनेर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीतच भाजपचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. यावेळी संदीप तेली यांनीही राष्ट्रवादी नेते माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल गळ्यात घालुन राष्ट्रवादीत प्रवेश केला या पक्ष प्रवेश वेळी बिलवाडीचे माजी सरपंच विजय भावसार, माजी ग्रा.पं. सदस्य डॉ.सुभाष पाटील व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी संजय गरूड यांनी सांगितले की सद्या जामनेर तालुक्यात व राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इनकमिंग सुरू असून गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.








