जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केटमध्ये भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १० वर्षीय मुलीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसांनी टाकाल धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजचा तपस करीत असून कारवाई जलद करण्याची महिती देण्यात आली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , गोलाणी मार्केटमध्ये आज दुपारी हनुमान मंदिरामागे उभ्या असलेल्या १० वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने खाण्याचे आश्वासन देत तिला तिसर्या मजल्यावर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली . घटनेनंतर नराधम पळून गेला . याबाबत पीडित मुलीने हि माहिती आपल्या आजीला कथन केल्यानंतर शहर पोलिसांनी धाव घेतली. याबाबत तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे .







