मुक्ताईनगर;– आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे नगरविकासमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक अशा १०० रुग्णवाहिकांचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले त्यापैकी १ रुग्णवाहिका मुक्ताईनगर शिवसेनेला देण्यात आली
मुक्ताईनगर तालुक्यातील रुग्णांना या रुग्णवाहिकेचा महत्वाचा फायदा होणार आहे कारण हा तालुका मोठी रुग्णालये असलेल्या शहरांपासून लांब अंतरावर असलेला तालुका आहे जिल्ह्याचे शहर असलेले जळगाव सुद्धा अंतरावर आहे मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद , अकोला , बुलढाणा या शहरांमध्ये जाण्याची गरज असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील रुग्णांना या रुग्णवाहिकमुळे दिलासा मिळाला आहे .