नवी दिल्ली ;- जगभरात कोरोनाने जनजीवन विस्कळित करून टाकले आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या लाखांच्या घरात गेलो आहे. गेल्या २४ तासात देशात २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, १३ जुलैपर्यंत देशभरात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०३ नमूण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख ८६ हजार २४७ नमूने काल (१३ जुलै) तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे.








