अमळनेर;- मधील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉंककडाऊन मध्ये अडकलेल्या आणि रोजगार नसल्याने मेटाकुटीस आलेल्या स्वाभिमानी बांधवांना आपल्याला मिळणाऱ्या घासातील घास देण्याच्या उदात्त भावनेने प्रेरीत होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानुसार मदत म्हणून अमळनेर युनिट च्या वतीने किराणा माला चे किट वाटप करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी सरकारने संचारबंदी व लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे रोजंदारी करून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करत होते त्यांना भूकबळी च्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याने बहुजन क्रांति मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आपल्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आप-आपल्या भागातील अश्या गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर बहुजन क्रांती मोर्चा युनिट च्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार सुनील करंदीकर व गोरगरीब, कष्टकरी व भटक्या जमातीनां त्यांच्या पर्यंत पोहचून पुरेसे किराणा सामानाचा किट देण्यात आले. याकामी समाजातील अनेक दानी लोकांनी सढळ हाताने मदत केली.
वाटप प्रसंगीं , कमलाकर संदांनशीव, आतिष बिर्हाडे, प्रमोद बिर्हाडे, अजय भामरे, प्रा भानुदास गुलाले, सुगध गाढे, ओम संदांनशीव, इंजी चंद्रकांत बिर्हाडे, सुनील करंदीकर सर, श्रीकांत चिखलोदकर उपस्थित होते.
या कामी प्रा जितेश संदानाशिव, प्रा विजय गाढे, प्रा जयश्री साळुंखे, प्रा सुनील वाघमारे, गौरव सोनवणे, गणेश बिर्हाडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिर्हाडे, मिलिंद निकम आदींनी परिश्रम घेतले.