मुंबई (वृत्तसंस्था ) आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र सरकारने पश्चिम बंगालसाठी विशेष ४१ श्रमिक रेल्वेची मागणी केली आहे. ज्या आज निघण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या अँफांन चक्रीवादळामुळे परिस्थिती बिघडलेली असल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने या रेल्वे पश्चिम बंगाल मध्ये घेण्याची समस्या असल्याचे सांगितले आहे. ही माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल सरकारसोबत हा मुद्दा सोडवावा अशी विनंती ही केली आहे. राज्यातून इतर ठिकाणीही रेल्वे आज जाणार आहेत.