शिवराम पाटील यांची पत्रकार परिषदेत मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री व नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते एकनाथराव खडसे यांचा कोरोना पॉझिटिवचा रिपोर्ट हा संशयास्पद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी केला आहे. याबाबत पुन्हा खडसे यांची कोरोना चाचणी करावी अशी मागणी त्यांनी शनिवारी २ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेतून केली आहे.
पत्रकार परिषदेत शिवराम पाटील पुढे म्हणाले की खडसे यांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वृत्तपत्रातून वाचायला मिळाला मात्र त्या आधी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री व इतर नेत्यांना भेटले होते. यापूर्वी त्यांचा १९ नोव्हेंबरला कोरोना पॉझिटिव अहवाल आला असल्याचे शिवराम पाटील म्हणाले. त्यामुळे आता एकनाथराव खडसे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे.







