जळगाव शहरालगतची रविवारची घटना ; आज एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी इंजिनिअरिंग काँलेज जवळ हॉटेल न्यु महिंद्रा धाब्यावर दि.13 रोजी रविवारी रात्री जेवणानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. एकाने दुसर्या गटावर पिस्तुल रोखले नंतर दोन्ही गटांनी भाडण मिटूऊन तडजोड केली असली तरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल न्यु महिंद्रा धाब्यावर दि.13 रोजी रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जळगावचे माजी नगरसेवक सुनिल माळी यांचा भाऊ मुकेश माळी यांच्या गटात हा वाद झाला. त्यापैकी केदारनाथ वामन सानप याने त्याच्याकडचे पिस्तुल काढून काही लोकांनवर रोखले होते.
यावेळी अनिल चौधरी यांच्या सोबत आलेले भाजपचे नगरसेवक भगत बालाणी यांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद मिटला.
सदर बातमी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, साय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, व अतुल वंजारी हे.काँ. जितेंद्र राजपूत,पो काँ. कीशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, अश्यानी या धाब्यावरील गटनेची चौकशी व सीसीटीव्ही फुटेज चेक केले.आणि तेथिल लोकांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार जेवनानंतर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी तेथील एका खुर्चीला लात मारुन खुर्ची कुत्र्याच्या अंगावर फेकली होती . हे करतांना अनिल चौधरी जे बोलले त्यावरून मुकेश माळी यांच्या गटाने त्याना जाब विचारला होता. पोलिसांनी धाबा मालक तुषार बाविस्कर यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर आज दि.15 रोजी पो.काँ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अनिल चौधरी,केदारनाथ वामन सानप,दुर्गश ठाकूर व अनिल चौधरी याचा वाहन चालक गोलू,भगत बालाणी मुकेश माळी,छोटु पाटील, आणि त्यांच्या सोबतचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रतापर शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय रामकृष्ण पाटील करीत आहे.