पंढरपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यातील सण उत्सवांवर अनेक बंधनं लादण्यात आली. आषाढी यात्राही प्रशासन व वारकरी समितीच्या योग्य समन्वयातून पार पडली. मात्र महाद्वारकाला मिरवणूकीत २० पेक्षा जास्त भाविकांनी गर्दी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांच्यासह इतरांवर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १८ जुलै पासून संत नामदेवरायांचा पुण्यतिथी सोहळा सुरू होणार आहे. मात्र नामदेवरायांच्या वंशजांनाच अटक करण्यात आल्यानं आता भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.







