जळगाव (प्रतिनिधी) – माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीला आपल्या मुलाखातीत सांगितले त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच त्यांनी हा दावा केला. माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असंही खडसे यांनी सांगितलं.







