जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा शेत शिवारातील शेतात ४२ वर्षीय सालदाराने झाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकी आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामांनद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोविंदा श्रावण बारी (४२, रा.बारीवाडा, पिंप्राळा) हे नीलेश दुबे यांच्याकडे सालदार म्हणून कामाला होते. शनिवारी दुपारी बैलजोडी घेऊन ते शेतात गेले. दिवसभर व रात्री घरी परतलेच नाही. उशिराने येतील म्हणून कुटुंबियानेही दिवसभर शोधाशोध केली नाही, मात्र रात्री त्यांचा शोध सुरु झाला. आज रविवारी सकाळी ११ ऑक्टोबर रोजी शेतातील काही मजुरांना गोविंदा बारी यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तातडीने त्यांच्या घरी माहिती कळविली. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनास्थळावर चिठ्ठी किंवा संशयास्पद असे काहीच आढळले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.