मुंबई ;- आज नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबई येथे त्यांचे मलबार हिल येथील नंदनवन निवासस्थानी एकनाथराव खडसे, अँड संजय राणे व जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी जळगांव जिल्हा न्यायालयासाठी असलेल्या ट्रॅफीक गार्डनच्या जागे संदर्भात भेट घेवुन न्यायालयच्या जागेची अत्यंत निकड असुन सध्या न्यायालय असलेल्या जागेत वकील व पक्षकार बांधवांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत सविस्तर चर्चा केली.
नवीन जागेचा प्रस्ताव आपलेकडे आला असुन त्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी केली, त्यांवर ना. एकनाथ शिंदे यांनी सदरचा विषय न्यायालयाचा असल्याने व आपण सांगीतलेल्या अडचणी रास्त असल्याने व न्यायालयासाठी जागा आवश्यक असल्याने संबंधीत अधिकारी यांना बोलवून त्वरित प्रस्ताव सादर करुन मंजुर करण्यासाठी ठेवा असे आदेश दिलेत. व येत्या काही दिवसातच नवीन जागेबाबत मंजुरी मिळेल असे आम्हास आश्वस्त केले.
त्यामुळे न्यायालयाचे नवीन जागेचा विषय येत्या काही दिवसातच मार्गी लागणार असुन न्यायालयाच्या जागेबाबत अनेक वर्षांपासुनचा विषय निश्यितच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.