श्रीनगर – दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब भागात मनिहाल गावामध्ये आज भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. यामध्ये चकमकीत लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी मारले गेले आहेत. या चारही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर एक जवान जखमी झाला आहे.








