हतनूर, गिरणा, वाघूर ५० टक्क्यांजवळ
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून संततधार भिज पाऊस सुरू आहे. रविवारी वातावरण स्वच्छ आणि कोरडे असून पावसाने काही काळ विश्रांती घेतली असल्याचे दिसले. आतापर्यंत जिल्ह्यात ६२.३ टक्के पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
गिरणा प्रकल्पात ११.४७ टक्के जलसाठा होता. गेल्या आठ दिवसात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने विश्रांती घेतली असून प्रकल्पात आवक मंदावल्याने आतापर्यत ४२.५५ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ पंधरा दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली होती. हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरी ३१२.९ टक्के पाऊस अपेक्षीत असून सरासरीच्या ३८८.७ मि.मी. नुसार १२४.७ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात व टक्क्यांवर पाऊस
जळगाव १३.४ (९७.१), भुसावळ ९.२ (६२.४), यावल २१.४ (१०९.०), रावेर २२.९ (१०९.९), मुक्ताईनगर १७.२ (९७.०), अमळनेर २.८(४३.२), चोपडा १५.५ (८७.५), एरंडोल ७.९ (२६.६), पारोळा १०.२ (३२), चाळीसगाव ४.६ (२६.९), जामनेर ९ (३९), पाचोरा १४.७ (३०.७), भडगाव १४.२ (३३.४), धरणगाव ८.३ (६३.८), बोदवड १७.९ (८६.२) असा एकूण १९६.१ मि.मी नुसार १२.३ मि.मी म्हणजेच सरासरी (६२.३ मि.मी) पावसाची नोंद झाली आहे. गिरणा प्रकल्प ४२.५५, हतनूर ३४.९०, वाघूर ६५.४४ असा १५.८४ टक्के उपयुक्त जलसाठा असून अग्नावती ४.११, अभोरा ८३.११, बहुळा ११.३८, तोंडापूर ३८.११, अंजनी ८.९२, गुळ ५४.२१, बोरी १.५७, मंगरूळ आणि सुकी १०० टकके तर हिवरा, भोकरबारी आणि मन्याड शून्य टक्के असा साठा आहे.