चाळीसगाव तालुक्यात हातगांव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हातगाव येथे मध्यरात्री चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत अंदाजे २ लाख रुपयांची रोकड आणि २ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. दोन दुचाकीवरील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य करत धाडसी घरफोडी केली. सुभाष मोतीराम चकोर हे कुटुंबासह मुंबईला गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील अंदाजे २ लाख रुपयांची रोकड तसेच २ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही चोरीची घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, त्यात २ दुचाकींवरून ४ चोरटे आल्याचे स्पष्ट दिसत आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.