जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात दोन ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी छापा टाकून ७० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याप्रकरणी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात काहीजण बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे हा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.