वजन कमी करण्यातही हसण्याची भूमिका महत्त्वाची आहे. मनमाेकळे व भरपूर हसल्याने शरीरात एंर्डाेिफस हार्माेन सक्रिय हाेतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. हसत राहण्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासाेबत लढणारी प्रणाली सक्षम हाेते. याच्यामुळे विविध संसर्ग आणि अॅलर्जीपासून रक्षण हाेते. चेहऱ्यावरील स्नायू सक्षम राहण्यासाठी आणि रक्तसंचार वाढण्यासाठी हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहताे.
एका संशाेधनानुसार, मधुमेहाने पीडित लाेकांनी जेवण केल्यानंतर काॅमेडी शाे पाहिल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळविण्यात यश येते. एका संशाेधनानुसार एक मिनिट हसण्यामुळे व १० मिनिटे व्यायाम केल्यानंतर हृदयाची गती सारख्याच तीव्रतेने वाढते. हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम हाेताे. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते. हसल्यामुळे स्ट्रेस हार्माेन्स कार्टिसाेल नियंत्रणात असताे. तसंच हसण्यामुळे डाेपामाइन आणि ग्राेथ हार्माेन्सची सक्रियता वाढते. हसणे प्रमाणात, याेग्य वेळी पाहिजे.