रावेर येथे डॉ. आंबेडकर चौकात घडली होती घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही पोलिसांना सापडलेले मंगळसूत्र स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मूळ मालकाला परत केले.

सखुबाई प्रमोद धनगर (रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वर्दळीत तुटून पडले. ते तैनात वाहतूक पोलिस पो. कॉ. गफार तडवी, रूबाब तडवी व गृहरक्षक दलाचे राहुल कासार यांना आढळले. त्यांनी ताबडतोब रावेर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याकडे सुपुर्द केले. त्यांनी. सीसीटीव्ही फुटेज तपासून मंगळसूत्राचा मूळ मालक ओळखला आणि ते सखुबाई प्रमोद धनगर यांना परत केले. सोन्याची किंमत दीड लाख रुपयाची आहे.









