जळगावातील घटना, पोलिसांपुढे आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) – अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करून ३ लाख ९३ हजार ७५० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना हरिविठ्ठल नगरात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा मोहन आगे (वय-६३, रा. बजरंग हाऊसिंग सोसायटी, हरीविठ्ठल नगर, जळगाव) या बाहेर गावी गेल्या असल्याने ११ मे ते २ ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद होते. या दरम्यान चोरट्यांनी संधी साधली. बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील सोन्याची पोत, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे टॉप्स आणि वेले असा एकुण ३ लाख ९३ हजार ७५० रुपयांचे दागिने चोरुन नेले. वर्षा आगे या घरी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यावेळी त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.