यावल तालुक्यात बिबटयांनीही धुमाकूळ केल्याने चिंता, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
यावल (प्रतिनीधी) : येथील यावल पूर्व आणि पश्चिम वन क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बिबट्या शेती शिवारात बिनधास्त फिरत असल्याची घटना घडली आहे. तरी या सोबत हरिणसुद्धा रात्रीच्या वेळेस यावल शहरात फिरताना दिसून आले आहे. बिबट्या शेती शिवारात, हरीण शहरात खुलेपणाने हिंडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार दि.२४ मार्च रोजी रात्री यावल शहरात खिर्नीपुरा, नगीना चौक परिसरात एक हरीण पळत गेल्याचे रात्री बॅडमिंटन रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी बघितले आणि ते छायाचित्र एकाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपले गेले आहे. यामुळे त्या हरिणाच्या मागे बिबट्या लागला असेल. त्यामुळे ते यावल शहरात पळत आले असेल तसेच यावल पूर्व आणि पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयात काही नागरिक कामानिमित्त गेले असता कार्यालयीन वेळेत संबंधित जबाबदार प्रमुख अधिकारी कर्मचारी शासकीय कामानिमित्त जळगाव कार्यालयात गेले असल्याची माहिती मिळाली. कार्यालयीन वेळेत अधिकारी अदृश्य आणि बिबट्या शेती शिवारात, हरीण शहरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.