जळगाव शहर पोलीस स्टेशनला सात जणांन विरुध्द गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीत नंबरने रांगा लावल्यावरून काल २७ रोजी मध्ये रात्री काही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडून हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कोर्टा जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूकीत नंबरवर रांग लागण्याच्या कारणावरून काही जणांन मध्ये वाद झाला यात शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.