जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील धनराज कोळी यांना पैशांच्या देण्याघेण्याच्या वादात जबर मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील २ आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
धनराज कोळी यांना १६ डिसेंबररोजी रात्री ११ वाजता आरोपी संदीप पोपट पाटील , भावेश पोपट पाटील व शिवाजी कडूबा पाटील यांनी मारहाण केली होती . धनराज कोळी यांच्या फिर्यादीवरून या आरोपींच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाल्यांनतर संदीप पाटील व शिवाजी कडूबा पाटील यांना २२ डिसेंबररोजी अटक करण्यात आली होती या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते
प्राणघातक हल्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासून पसार होते त्यांना काल रात्री स पो नि प्रमोद कठोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर स फौ अतुल वंजारी , जितेंद्र राठोड , समाधान टाहकळे , सचिन मुंडे , यशोधन ढवळे , पोलीस चालक इम्तियाज खान यांनी अटक केली होती त्यांना आज न्या ए एस शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे सरकारतर्फे ऍड स्वाती निकम यांनी काम पाहिले तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे आपसातल्या वादातून त्यांचे भांडण झाले होते पुढील तपास स पो नि प्रमोद कठोरे , किरण पाटील करीत आहेत