फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळन्हावी येथे जुन्या वादातून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे .
किशोर राजेंद्र सोनवणे (वय-२८) रा. कोळन्हावी ता. यावल शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ते यावल तालुक्यातील अकलुद येथील हॉटेल जलसा येथे दुचाकी (एमएच १९ बीएफ ३१८९) ने आला होता. त्यावेळी दोन वर्षांपुर्वी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल सुनिल कोळी रा. कठोरा ता. यावल, प्रदीप उर्फ गोलू दिलीप कोळी रा. रायपूर ता. रावे यांच्यासह दोन अनोळखी तरूण यांनी किशोर सोनवणे यांच्याजवळ येवून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर एकाने दुचाकी जाळून टाकली. यात दुचाकी जळून खाक झाली आहे. याप्रकरणी किशोर सोनवणे याने शनिवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी फैजपूर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.