पुणे (वृत्तसंस्था ) ससून रुग्णालयातील कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर “मोक्का”नुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे त्याच्यावर 25 ऑगस्ट पासून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी अमोल बागड यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड जखमी झाले आहेत. यानंतर हल्लेखोरांनी त्याहून पळ काढला . बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.