जळगाव ;– वादातून तांबापुरा येथे लग्नस्थळी वाद झाल्याने एकावर दोघांनी चॉपर मारून जखमी केल्याची घटना १५ रोजी रविवारी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे .
शाहरूख उर्फ अशपाक सलीम खाटीक असे जखमी तरूणाचे नाव आहे. चॉपर हल्लाप्रकरणी सरजील हारुण पटवा व अमीन उर्फ बुलटे पटवा यांनी शाहरुखवर वार केले.
नसीम खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरजील व अमीन यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







