जळगाव ;-येथील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि , शहरातील व.वा. वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखाना आवारात व जिमखान्यात बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या (वय-५१) रा. टीएम नगर सिंधी कॉलनी यांना खंडणी मागत त्यांच्यावर प्राणघातक हल्लाची घटना १६ जानेवारी २०२० रोजी घडली होती. साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात फरार संशयित आरोपी नगरसेवक प्रवीण देविदास कोल्हे (वय ३२, रा.कोल्हेवाडा, जुने जळगाव) याला सोमवारी २० रोजी पहाटे शहर पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अरुण निकम तपास करीत आहेत.