जळगाव ;- ;-पाकिस्तानी हॅकरकडून आरोग्य सेतू अँपद्वारे नागिरीकांची माहितीची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले असून भारतीय सैन्य तसेच
नागरिकांची माहिती चोरण्यासाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तुमच्या एक क्लीकने तुमच्या मोबाईलचा सर्व अँक्सेस पाकिस्तानी हॅकरकडे जाऊ
शकतो. तसेच तुमच्या मोबाईलची सर्व माहिती, पासवर्ड चोरले जाऊ शकते.
त्यामुळे सरकारी वेबसाइट्वरुनच आरोग्य सेतू अँप डाउनलोड करावे असे आवाहन जळगाव सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.