आज होणार अंत्यसंस्कार
जळगाव ;- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल गफ्फार मलिक (वय ७२) यांचे साेमवारी रात्री १०.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता ईदगाह कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार होणार आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष, इकरा एज्युकेशन साेसायटीचे सचिव अशी पदे त्यांनी भुषवली हाेती. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.







