जळगाव तालुक्यातील सुप्रीम कंपनीत घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – कंपनीतून सुटी झाल्यानंतर प्रवेशद्वारावर इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये हजेरी करण्यावरून करण्यावरुन हर्षल नारायण शेळके (१९, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुप्रिम कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील हर्षल शेळके हे सुप्रिम कंपनीत नोकरीला आहे. दिनांक ३० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतून सुटी झाल्यानंतर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर थंब पंचिंग करण्याच्या कारणावरुन वाद झाला. यातून चार जणांनी हर्षल शेळके यांना हॉकीस्टीकने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली. या प्रकरणी शेळके यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.