एलसीबीची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हद्दपार करण्यात आलेल्या हद्दपार आरोपीचा वावर शहरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून संशयीताला अटक केली. आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (वय २४, रा.पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील पंचशील नगर भागात आकाश हा हद्दपार असतानाही वावरत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत संशयीातविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील आदींच्या पथकाने केली.