भुसावळ ( प्रतिनिधी ) – दोन वर्षांसाठी हद्दपार केले असूनदेखील भुसावळातच वास्तव्य करणार्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे याला जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. हद्दपार असतांनाही तो समतानगरात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुुणगहू, समाधान पाटील व अन्य कर्मचार्यांना माहिती देऊन कारवाई च्या सूचना दिल्या.
शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे याला अटक करण्यात आली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







