पुणे (वृत्तसंस्था ) ;-जळगाव शहरातील द जळगाव पीपल्स बॅँकेच्या हडपसर मधिल शाखेच्या तीन मजली इमारतीला आज भीषण आग लागल्याची घटना वैभव टॉकीजजवळ घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांना तिसर्या मजल्यावरून उतरवून अनेकांचे प्राण वाचविण्यात आले.
आग पूर्णपणे आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग नेमके कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.