कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात लसीकरण सुरू आहे. तथापि, लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यास दुसरा डोस केव्हा घ्यावा, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता यावर खुलासा केला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली तर बरे झाल्यानंतर दुसरा डोस तीन महिन्यांपर्यंत टाळावा.